चालू घडामोडी (16 ऑगस्ट 2022)
श्रीलंकेच्या सागरी सुरक्षेसाठी भारताचे ‘डॉर्निअर’ दाखल :
- भारताने सोमवारी श्रीलंकेला डॉर्निअर विमान हस्तांतरित केले.
- त्यामुळे श्रीलंकेची सागरी टेहळणी क्षमता वाढणार असून भारत-श्रीलंका दरम्यानचे द्विपक्षीय संरक्षण संबंध आणखी मजबूत झाले आहेत.
- भारत आपला 75 वा स्वातत्र्य दिन साजरा करीत असताना झालेल्या या विमान हस्तांतरण सोहळय़ाला श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे उपस्थित होते.
- विशेष म्हणजे श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात उद्या, मंगळवारी चीनचे क्षेपणास्त्र आणि उपग्रहांचा माग काढणारे जहाज दाखल होत आहे.
- भारतीय नौदलाच्या संशोधनातून तयार झालेले हे विमान श्रीलंका देण्यात आल्याने त्यांची तातडीची संरक्षणात्मक गरज पूर्ण होणार आहे.
- या विमानाच्या वापरासाठी भारतीय नौदलाने श्रीलंकेच्या नौदल आणि हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांना चार महिने सखोल प्रशिक्षण दिले आहे.
इयान चॅपेलने पुन्हा घेतली निवृत्ती :
- क्रिकेट खेळामध्ये दोन्ही संघ, पंच आणि मैदानाबरोबर चांगल्या समालोचकालादेखील तितकेच महत्त्व आहे.
- काही प्रसिद्ध क्रिकेट समालोचकांनी आपल्या आवाजामुळे चाहत्यांच्या मनात कायमची जागा मिळवलेली आहे.
- अशाच समालोचकांमध्ये ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांचा समावेश आहे. गेल्या 45 वर्षांपासून चॅपेल समालोचनाचे काम करत होते.
- आता त्यांनी आपल्या साडेचार दशकांच्या कारकिर्दीचा शेवट करण्याचा निर्णय घेतला आहे.
- चॅपेल यांनी समालोचनामधून निवृत्ती घेतली आहे.
- इयान चॅपेल यांनी ऑस्ट्रेलियासाठी 75 कसोटी सामने खेळून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्यांनी समालोचन सुरू केले होते.
दिनविशेष :
- 16 ऑगस्ट 1913 मध्ये स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विश्वविद्यालय बनले.
- सायप्रसला युनायटेड किंग्डमपासुन 16 ऑगस्ट 1960 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.
- 16 ऑगस्ट 1962 मध्ये आठ वर्षांनंतर उर्वरित फ्रेंच भारत प्रदेश भारताला देण्यात आले.
- जपानला मागे टाकुन चीन ही 16 ऑगस्ट 2010 मध्ये जगातली दुसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली.
The post 16 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs appeared first on Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN.
from Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN https://ift.tt/fu3qWIm
via