चालू घडामोडी (15 ऑगस्ट 2022)
राज्यात शासकीय कार्यालयांमध्ये ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्‘ने संभाषणाला होणार सुरुवात :
- यापुढे महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करतील, अशी घोषणा राज्याचे नवे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
- मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर होऊन सांस्कृतिक खात्याची जबाबदारी येताच स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सुधीर मुनगंटीवारांनी ही घोषणा केली.
- या निर्णयाची घोषणा करताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “वंदे मातरम् हे आपले राष्ट्रगान आहे. हा केवळ एक शब्द नसून भारतीयांच्या भारतमातेविषयीच्या भावनांचे प्रतिक आहे.
- सांस्कृतिक कार्यविभागातर्फे लवकरच याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल, असंही मुनगंटीवारांनी नमूद केलं.
राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर :
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले आहे.
- त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग ठेवले आहेत.
- याशिवाय शिंदे गटातील नऊ मंत्र्यांनाही वेगवेगळी खाती दिली आहेत. पाणीपुरवठा व स्वच्छता, बंदरे व खनिकर्म, अन्न व औषध प्रशासन, रोजगार हमी योजना व फलोत्पादन, उद्योग, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, कृषी, शालेय शिक्षण व मराठी भाषा ,राज्य उत्पादन शुल्क.
- दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.
राष्ट्रकुलमध्ये सहभागी खेळाडूंकडून पंतप्रधान मोदींना भेटवस्तू :
- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील चमकदार कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून झालेल्या सन्मानाने भारतीय खेळाडू भारावून गेले.
- पंतप्रधानांच्या भेटीमुळे आणि त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आमचा आत्मविश्वास वाढल्याची भावना खेळाडूंनी व्यक्त केली.
- पंतप्रधानांनी शनिवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंचा गौरव केला होता. त्यानंतर खेळाडूंनी पंतप्रधानांना काही भेटवस्तूही दिल्या.
दिनविशेष :
- 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला.
- मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना 15 ऑगस्ट 1862 मध्ये झाली.
- पं. नेहरू 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान झाले.
- 15 ऑगस्ट 1948 मध्ये दक्षिण कोरिया या देशाची निर्मिती झाली.
- 15 ऑगस्ट 1960 मध्ये कॉँगो देश फ्रांसपासून स्वतंत्र झाला.
The post 15 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs appeared first on Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN.
from Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN https://ift.tt/Q6xzLMr
via