चालू घडामोडी (14 ऑगस्ट 2022)
‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेला दिमाखात प्रारंभ :
- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी अवघा देश सज्ज झाला असून शनिवारी देशाच्या कानाकोपऱ्यात ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला तिरंगी उत्साहात प्रारंभ झाला.
- अनेक राज्यांमध्ये तिरंगा यात्रा आणि प्रभात फेऱ्या काढून ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.
- त्यांत राजकीय नेत्यांनी, समाजसेवकांनी, विद्यार्थ्यांनी मोठय़ा संख्येने सहभाग घेतला.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संपूर्ण देशभर उत्साहरंग उसळला असून देशाच्या अनेक भागांचा आसंमत तिरंगी रंगांत न्हाऊन निघाला आहे.
नामांकित धावपटू लिडीया यांचे निधन :
- 1980च्या दशकात आशियातील सर्वात वेगवान धावपटू अशी ख्याती मिळवणाऱ्या लिडीया डी वेगा यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले.
- 1980च्या दशकातील धावण्याच्या शर्यतींवर लिडीया यांची जणू मक्तेदारी होती. त्यांनी आपल्या कारकीर्दीत 15 सुवर्णपदकांची कमाई केली.
- लिडीया यांनी 1987 मध्ये 100 मीटर शर्यत जिंकताना 11.28 सेकंद अशी सरस वेळ दिली होती.
- 1982च्या नवी दिल्ली आणि 1986च्या सेऊल अशा दोन आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये तिने १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले.
- भारताच्या दिग्गज धावपटू पी. टी. उषा आणि लिडीया यांच्यात पदकांसाठी कायम चुरस असायची.
मेसीला बॅलन डी’ओर पुरस्काराच्या यादीतून वगळले :
- सात वेळा विजेत्या लिओनेल मेसीला प्रतिष्ठेच्या बॅलन डी’ओर पुरस्कारासाठी यंदा 30 जणांच्या नामांकितांच्या यादीमध्ये स्थान मिळालेले नाही.
- 2005 सालानंतर प्रथमच मेसीविना बॅलन डी’ओर पुरस्कारासाठी नामांकितांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
- अर्जेटिनाचा कर्णधार मेसीने पोलंडचा आघाडीपटू रॉबर्ट लेवांडोवस्कीला मागे टाकत गेल्या वर्षी सातव्यांदा बॅलन डी’ओर पुरस्कार मिळवला होता.
- पॅरिस सेंट-जर्मेनकडून पहिल्या हंगामात खेळताना समाधानकारक कामगिरी न करता आल्याने मेसीला यंदा नामांकन देण्यात आले नाही.
- 35 वर्षीय मेसीने 2019मध्येही हा पुरस्कार पटकावला होता.
- लेवांडोवोस्की, किलियान एम्बापे, करीम बेन्झिमा, अर्लिग हालंड आणि पाच वेळा विजेता ख्रिस्तिआनो रोनाल्डो या नामांकित खेळाडूंचा बॅलन डी’ओर पुरस्कारासाठीच्या नामांकितांच्या यादीत समावेश आहे.
- यासह मोहम्मद सलाह, सादिओ माने, केव्हिन डीब्रूएने, हॅरी केन आणि सॉन ह्युंग-मिन हेसुद्धा या पुरस्कारासाठी शर्यतीत आहेत.
- मँचेस्टर सिटीकडून डीब्रूएने आणि हालंड यांच्यासह फिल फोडेन, जोओ कॅन्सेलो, रियाद महरेझ, बर्नाडरे सिल्वा यांना, तर लिव्हरपूलकडून ट्रेंट अॅलेक्झांडर-आर्नोल्ड, लुइस डियाझ, फॅबिनिओ, डार्विन नुनेझ, सलाह आणि व्हर्जिल व्हॅन डाइक यांचाही या यादीत समावेश आहे.
दिनविशेष :
- 14 ऑगस्ट हा ‘संस्कृत दिन‘ म्हणून पाळला जातो.
- सन 1862 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
- नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सन 1943 मध्ये सन्माननीय डी.लिट. पदवी दिली.
- लॉर्ड माउंट बॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून 14 ऑगस्ट 1947 रोजी नेमणूक झाली होती.
- सन 1958 मध्ये एअर इंडियाची दिल्ली-मॉस्को विमानसेवा सुरू झाली.
The post 14 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs appeared first on Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN.
from Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN https://ift.tt/WTbSMUO
via