13 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs

व्हीव्हीएस लक्ष्मण

चालू घडामोडी (13 ऑगस्ट 2022)

जगदीप धनखड बनले देशाचे 14 वे उपराष्ट्रपती :

  • पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांनी देशाचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.
  • नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धनखड यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
  • दिल्लीतील राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह विविध पक्षातील नेते या शपथविधी सोहळ्यात उपस्थित होते.

चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड :

  • मंत्रीमंडळ विस्तारानंतर भाजपाकडून नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे.
  • चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
  • भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर भाजपाकडून ही नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
  • आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता आशिष शेलार यांच्याकडे असलेली मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे.

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक :

  • राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांनी दिली.
  • आशिया चषक स्पर्धेपूर्वी हा दौरा होणार आहे.
  • झिम्बाब्वे दौऱ्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार असून, अखेरचा सामना 22 ऑगस्ट रोजी होणार आहे.
  • आशिया चषकासाठी भारतीय संघ प्रशिक्षक द्रविडसह 23 ऑगस्ट रोजी संयुक्त अरब अमिरातीत दाखल होणार आहे.

‘युएफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी तिघे शर्यतीत :

  • चॅम्पियन्स लीग विजेत्या रेयाल माद्रिद संघाचा तारांकित आघाडीपटू करीम बेन्झिमा आणि गोलरक्षक थिबो कोर्टवा यांच्यासह मँचेस्टर सिटीचा प्रमुख मध्यरक्षक केव्हिन डीब्रूएनेला ‘युएफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.
  • प्रशिक्षक आणि निवडक पत्रकारांच्या मतांच्या आधारे बेन्झिमा, कोर्टवा आणि डीब्रूएने यांच्या नावांना पसंती देण्यात आली.
  • बेन्झिमाने चॅम्पियन्स लीगच्या गेल्या हंगामात 15 गोल केले होते.
  • तसेच अंतिम लढतीत लिव्हरपूलवरील रेयालच्या विजयात गोलरक्षक कोर्टवाने निर्णायक भूमिका बजावली होती.
  • डीब्रूएनेने प्रीमियर लीग आणि चॅम्पियन्स लीगमध्ये केलेल्या सातत्यपूर्ण खेळामुळे त्यालाही नामांकन मिळाले.
  • गतवर्षीच्या नामांकनातील एकाही खेळाडूला या वर्षीच्या यादीत स्थान मिळालेले नाही.
  • महिला पुरस्कार्थीची अंतिम नामांकन यादी पुढील आठवडय़ात जाहीर करण्यात येणार आहे.

दिनविशेष :

  • ‘क्रिस्टियन हायगेन्स‘ या शास्त्रज्ञाने 13 ऑगस्ट 1642 रोजी मंगळाच्या दक्षिण धृवावरील बर्फाच्या टोप्यांचा शोध लावला.
  • ‘त्र्यंबक बापूजी ठोंबरे‘ तथा ‘बालकवी‘ यांचा जन्म 13 ऑगस्ट 1890 मध्ये झाला.
  • ‘कार्ल गुस्ताव्ह विट‘ याने सन 1898 मध्ये 433 Eros या पृथ्वीजवळच्या पहिल्या लघुग्रहाचा शोध लावला.
  • लेखक ‘प्रल्हाद केशव‘ तथा ‘आचार्य अत्रे‘ यांचा जन्म 13 ऑगस्ट 1898 मध्ये झाला.
  • सन 1918 मध्ये बायरिसचे मोटेर्न वेर्के एजी (बी.एम.डब्ल्यू.) ही सार्वजनिक कंपनी म्हणून स्थापन झाली.
व्हीव्हीएस लक्ष्मण

The post 13 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs appeared first on Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN.



from Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN https://ift.tt/YSmr1cJ
via

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.