17 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs

चालू घडामोडी (17 ऑगस्ट 2022)

मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय :

  • केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर राज्य सरकारनेदेखील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ केली आहे. पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
  • तर ही वाढ ऑगस्ट 2022 पासून रोखीने देण्यात येणार आहे. यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 वरुन 34 टक्के इतका होणार आहे.
  • स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे.
  • वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत वापरली जाणारी वैद्यकीय विषयक उपकरणे व इतर अनुषंगिक खरेदी ही गव्हर्मेंट ई-मार्केटप्लेस (GeM) या पोर्टलच्या माध्यमातून खरेदी करावी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत.
  • गोविंदा पथकांसाठी शासनाने विमा कवच द्यावा, अशी मागणी होत होती. या मागणीनुसार, दहीहंडी पथकातील गोविंदांना आता 10 लाखांचं विमा संरक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे.

अरुणाचलच्या कामेन्गमध्ये हायटेक सेवेला सुरुवात :

  • अरुणाचलमध्ये ड्रोन यंत्रणेवर आधारीत आरोग्य सेवा सुरू करण्यात आली आहे.
  • पूर्व कामेन्ग जिल्ह्यात सोमवारी या आरोग्य सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
  • पहिल्या टप्प्यात कामेन्गमधील सेप्पा ते चायान्ग ताजो या मार्गावर ही सेवा कार्यरत असणार आहे.
  • अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी या सेवेचा 50 सेकंदांचा व्हिडीओ ट्विटरवरुन शेअर केला आहे.
  • या प्रकल्पासाठी युनायटेड स्टेट्स फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटने(USAID) निधी दिला आहे.
  • बंगळुरूच्या ‘रेडविंग लॅब्स’ या स्टार्टअपद्वारे हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.
  • या प्रकल्पाद्वारे आरोग्यसेवेतील समस्या, आर्थिक व्यवहार्रता यावर लक्ष ठेवले जाणार आहे.

‘बीसीसीआय’चे माजी सचिव अमिताभ चौधरी यांचे निधन :

  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी सचिव आणि झारखंड क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अमिताभ चौधरी यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. चौधरी निवृत्त ‘आयपीएस’अधिकारी होते.
  • झारखंड पोलीस दलात पोलीस महानिरीक्षक पदापर्यंत जबाबदारी त्यांनी सांभाळली होती.
  • चौधरी यांनी ‘बीसीसीआय’चे संयुक्त सचिव म्हणूनही काम पाहिले.
  • 2005च्या झिम्बाब्वे दौऱ्यात ते भारताचे प्रशासकीय व्यवस्थापक होते.

‘फिफा’ची भारतावर बंदी :

  • सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे ‘फिफा’ने (आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ) मंगळवारी भारतावर बंदी घातली आहे.
  • या कारवाईमुळे भारताने 11 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपदही गमावले आहे.
  • अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) 85 वर्षांच्या इतिहासात प्रथमच ही बंदीची नामुष्की ओढवली आहे.
  • तिऱ्हाईताच्या हस्तक्षेपामुळे ‘फिफा’च्या नियमावलीचे गांभीर्याने उल्लघंन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
  • ‘फिफा’च्या कारवाईमुळे ‘एआयएफएफ’ने सर्व सदस्यत्वे पुढील सूचना मिळेपर्यंत गमावली आहेत.
  • देशातील फुटबॉल क्लब्ज तसेच खेळाडू, सामनाधिकारी, पदाधिकारी यापुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करू शकणार नाही.
  • त्यामुळे ‘फिफा’च्या किंवा आशियाई फुटबॉल महासंघाच्या स्पर्धा, प्रशिक्षण किंवा गुणवत्ता विकास कार्यशाळांमध्ये त्यांना सहभागी होता येणार नाही.

दिनविशेष:

  • सन 1666 मध्ये शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून पसार झाले.
  • श्री शिवाजी मराठा हायस्कूल पुणे चे संस्थापक बाबूराव जगताप यांचा जन्म 17 ऑगस्ट 1888 मध्ये झाला.
  • 17 ऑगस्ट 1909 हा दिवस क्रांतीकारात मदनलाल धिंग्रा यांचे स्मृतीदिन आहे.
  • ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ. विनायक पेंडसे यांचा जन्म 17 ऑगस्ट 1916 मध्ये झाला.

The post 17 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs appeared first on Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN.



from Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN https://ift.tt/gikPShf
via

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.