9 एप्रिल 2022 चालू घडामोडी – Current Affairs

केतनजी ब्राऊन जॅक्सन

चालू घडामोडी (9 एप्रिल 2022)

18 वर्षांवरील सर्वाना वर्धक मात्रा :

  • रविवारपासून 18 वर्षांवरील सर्वाना करोनाची वर्धक मात्रा (बूस्टर डोस) सशुल्क देण्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी केली.
  • करोनाची दुसरी मात्रा घेतल्यानंतर 9 महिने पूर्ण झालेले 18 वर्षांवरील सर्व नागरिक सशुल्क वर्धक मात्रेसाठी पात्र आहेत, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
  • 18 वर्षांवरील सर्वाना खासगी लसीकरण केंद्रांवर वर्धक मात्रा सशुल्क उपलब्ध करण्यात येईल, असेही आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
  • ‘सीरम’निर्मित कोव्हिशिल्डच्या एका वर्धक मात्रेसाठी 600 रुपये मोजावे लागणार आहेत.

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदी प्रथमच कृष्णवर्णीय महिला :

  • अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयात एका कृष्णवर्णीय महिलेची न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली आहे.
  • तर केतनजी ब्राऊन जॅक्सन असे या महिलेचे नाव आहे.
  • जॅक्सन या सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झालेल्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहेत.
  • तसेच जॅक्सन न्यायमूर्ती स्टीफन ब्रेयर यांची जागा घेतील.
  • जॅक्सन यांच्या नियुक्तीमुळे आता सर्वोच्च न्यायालयात प्रथमच चार महिला न्यायमूर्ती असतील. त्यापैकी दोन कृष्णवर्णीय न्यायमूर्ती आहेत.

सर्वोच्च न्यायालयाची दुरुस्ती कायद्याला मंजुरी :

  • ‘परकीय योगदान (नियमन) कायदा- 2010’मध्ये केंद्राने केलेल्या दुरुस्तींना सर्वोच्च न्यायालयाने अखेर शुक्रवारी मंजुरी दिली.
  • तर या दुरुस्ती कायद्याद्वारे प्रामुख्याने सार्वजनिक सुव्यवस्था व सामान्य जनतेचे हित जपले जाऊ शकेल.
  • तसेच, परकीय स्रोतांतून येणाऱ्या विदेशी योगदानाचा गैरवापर रोखण्याचा हेतू आहे.
  • सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी ही दुरुस्ती गरजेची असल्याची टिप्पणी न्यायालयाने केली आहे.
  • तीन रिट याचिकांवर एकत्रित सुनावणी घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धात दक्षिण कोरियावर शानदार विजय :

  • भारतीय महिला हॉकी संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखताना शुक्रवारी दक्षिण कोरियाला 3-0 असे नामोहरम केले आणि ‘एफआयएच’ कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेची दुसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली.
  • भारताने साखळीत सर्व सामने जिंकत अग्रस्थानासह उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
  • कोरियाविरुद्ध उपांत्यपूर्व सामन्यात भारताकडून मुमताज खान, लालिरडिकी आणि संगीता कुमारी यांनी गोल केले.
  • तसेच नेदरलँड्सशी भारताची रविवारी उपांत्य फेरी होईल.

कोरिया खुली बॅडिमटन स्पर्धात श्रीकांत, सिंधू विजयी :

  • भारताच्या पी. व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत यांनी शुक्रवारी दिमाखदार विजयांसह कोरिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
  • महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या सिंधूने बुसानन ओंगबामरुंगफानवर 21-10, 21-16 असा विजय मिळवला.
  • तर तिसऱ्या मानांकित सिंधूने बुसाननविरुद्ध 17-0 असे वर्चस्व राखले.
  • पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीतील माजी अग्रस्थानावरील खेळाडूंमधील झुंज रंगतदार ठरली.
  • पण श्रीकांतने कोरियाच्या सन वॅन हू याच्यावर 21-12, 18-21, 21-12 अशी मात केली.

दिनविशेष:

  • समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा जन्म 9 एप्रिल 1828 रोजी झाला.
  • पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक विष्णू गंगाधर तथा दादासाहेब केतकर यांचा जन्म 9 एप्रिल 1887 मध्ये झाला.
  • सन 1967 मध्ये बोइंग-767 या विमानाने पहिले उड्डाण केले होते.
  • सन 1994 सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ पी.एम. भार्गव यांना आर.डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • लता मंगेशकर यांना सन 1995 मध्ये अवधरत्न अनई साहू सूरसन्मान प्रदान करण्यात आले.
chalu-ghadamodi

The post 9 एप्रिल 2022 चालू घडामोडी – Current Affairs appeared first on Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN.



from Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN https://ift.tt/nyN5cDA
via

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.