10 एप्रिल 2022 चालू घडामोडी – Current Affairs

अभिनेत्री सुहास जोशी

चालू घडामोडी (10 एप्रिल 2022)

कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी :

  • महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरूद्ध मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांच्यात अटीतटीची लढत झाली.
  • तर यामध्ये पृथ्वीराज पाटील याने विशाल बनकर याचा पराभव करत, 2022 ची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली.
  • पृथ्वीराजने चार गुणांची पिछाडी भरून काढत पाच विरुद्ध चार असा विजय मिळवला.
  • तसेच राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघ आयोजित 64 वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब मैदान जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली होती.

ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान :

  • अभिनय क्षेत्रातील त्यांच्या असामान्य योगदानासाठी, 2018 चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार काल सुहास जोशी यांना प्रदान करण्यात आला आहे.
  • उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान केला गेला.
  • संगीत, नाट्य, नृत्य, लोककला या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, पं. सुरेश वाडकर, नाटककार राजीव नाईक यांच्यासह 44 कलावंतांना वर्ष 2018 चे संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार जाहीर झाले होते.
  • तर अकादमी पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या कलावंतांना प्रत्येकी एक लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात येते.

चीनचा प्रस्ताव भारताने फेटाळला :

  • भारताने पूर्व लडाखमधील हॉट स्प्रिंग्ज येथील गस्ती पॉइंट 15 वरून फौजा परत घ्याव्यात हा चीनचा प्रस्ताव भारताने फेटाळून लावला आहे.
  • चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी गेल्या महिन्यात भारतात आले होते, त्याच सुमारास चीनने हा प्रस्ताव भारतापुढे ठेवला होता.
  • ’पेट्रोलिंग पॉइंट 15’ (पीपी 15)वर गेल्या सुमारे दोन वर्षांपासून भारतीय फौजांच्या समोरासमोर असलेल्या भारतीय फौजा पीपी 16 व पीपी 17 दरम्यानच्या करमसिंग चौकीपर्यंत मागे न्याव्यात असा प्रस्ताव चीनने ठेवला होता.
  • तर आपण आपल्या फौजा प्रत्यक्ष ताबा रेषेच्या थोडय़ा मागे घेऊ असे चीनने सांगितले होते.
  • चीनची दावारेषा आणि भारताच्या दृष्टीने असलेली प्रत्यक्ष ताबा रेषा पीपी 15 वर जवळजवळ छेदत असल्यामुळे भारताला हा प्रस्ताव मान्य होण्यासारखा नव्हता.
  • भारताने हा प्रस्ताव मान्य केला असता तर चिनी फौजा फारच कमी अंतर मागे गेल्या असत्या, पण भारतीय फौजांना अनेक किलोमीटर मागे यावे लागले असते.

करोनावरील वर्धक मात्रा स्वस्त :

  • करोना लशीच्या वर्धक मात्रेचे शुल्क कमी करण्याची घोषणा सीरम इन्स्टिटय़ूट आणि भारत बायोटेक या लसउत्पादक कंपन्यांनी शनिवारी केली.
  • केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर वर्धक मात्रेचे शुल्क 225 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सीरम आणि भारत बायोटेकने स्पष्ट केले.
  • सीरमच्या कोव्हिशिल्ड वर्धक मात्रेचे शुल्क 600, तर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन मात्रेचे शुल्क 1200 रुपये होते.
  • भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनची किंमत सुमारे 81 टक्क्यांनी कमी केली, तर सीरमने कोव्हिशिल्डच्या शुल्कात सुमारे 62 टक्के घटवले.

दिनविशेष:

  • होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हानेमान यांचा जन्म 10 एप्रिल 1755 रोजी झाला.
  • विविध ज्ञानविस्तार मासिकाचे संपादक रामचंद्र गुंजीकर यांचा जन्म 10 एप्रिल 1843 मध्ये झाला.
  • बिर्ला उद्योगसमूहाचे संस्थापक घनश्यामदास बिर्ला यांचा जन्म 10 एप्रिल 1894 मध्ये झाला होता.
  • अर्थशास्त्रज्ञ, भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते, सहकारी चळवळीचे खंदे समर्थक तसेच पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. धनंजय रामचंद्र तथा द.रा. गाडगीळ यांचा जन्म 10 एप्रिल 1901 रोजी झाला.
  • इंग्लंडमधील साऊथम्प्टन बंदरातून टायटॅनिक जहाजाने 1912 यावर्षी पहिल्या आणि शेवटच्या प्रवासाला सुरुवात केली होती.
  • सन 1955 मध्ये योहान साल्क यांनी सर्वप्रथम पोलिओ लसीची यशस्वी चाचणी केली.
chalu ghadamodi
chalu ghadamodi

The post 10 एप्रिल 2022 चालू घडामोडी – Current Affairs appeared first on Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN.



from Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN https://ift.tt/TPqv6KI
via

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.