चालू घडामोडी (30 ऑगस्ट 2022)
तातडीच्या दाव्यांसाठी गुरुवारपासून नवी यंत्रणा :
- तातडीचे दावे सूचिबद्ध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय लवकरच नवी यंत्रणा कार्यान्वित करणार आहे, असे सरन्यायाधीश उदय लळित यांनी सोमवारी सांगितले.
- येत्या गुरुवारपासून त्यांची अंमलबजावणी सुरू होईल, असेही न्यायमूर्ती लळित यांच्या नेतृत्वाखालील द्विसदस्यीय पीठाने स्पष्ट केले.
- तातडीच्या दाव्यांच्या सुनावणीसाठी त्यांना सूचिबद्ध करण्याबाबतच्या मुद्याकडे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी खंडपीठाचे लक्ष वेधले.
- त्यावर, नोंदणी करण्यात आलेले प्रत्येक प्रकरण कधी ना कधी सूचिबद्ध होतेच आणि त्याचा समावेश अद्ययावत सूचितही होतो.
- अशी प्रकरणे 10 दिवसांत सूचिबद्ध होतात किंवा अद्ययावत यादीत त्यांचा समावेश होतो, असे न्यायमूर्ती लळित यांनी स्पष्ट केले.
नासाची आर्टेमिस- 1 मोहीम पुढे ढकलली:
- अमेरिकन अंतराळ संस्था नासाची आर्टेमिस-1 चंद्र मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे.
- रॉकेटचे प्रक्षेपण सोमवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.03 वाजता होणार होते.
- मात्र, रॉकेटच्या चार इंजिनांपैकी एका इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे प्रक्षेपणाच्या काही मिनिटापूर्वीच रॉकेटचे उड्डाण थांबवण्यात आले.
- 2 सप्टेंबर रोजी रात्री 10.18 वाजता रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
- आर्टेमिस-1 ही मानवरहित मोहीम आहे.
- पहिल्या उड्डाणासह, शास्त्रज्ञांनी चंद्रावरील परिस्थिती अंतराळवीरांसाठी योग्य आहे की नाही हे शोधण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
रिटेल व्यवसाय प्रमुखपदी ईशा अंबानीची नियुक्ती :
- देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये फाइव्ह जीसंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे.
- या सभेमध्ये आपल्या भाषणात रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी जगभरातील गुंतवणुकदारांचं लक्ष लागलेल्या भाषणामध्ये ही घोषणा केली.
- या सभेमध्ये मुकेश अंबानी यांनी आपली मुलगी ईशा अंबानी हिचा समूहाच्या रिटेल व्यवसाय प्रमुख म्हणून ओळख करुन दिली.
- यापूर्वी मुकेश अंबानी यांनी मुलगा आकाश याला समूहाची टेलिकॉम शाखा रिलायन्स जिओच्या अध्यक्षपदी नियुक्त केले होते.
भारतातील पहिली सरकारी ऑनलाइन टॅक्सी सेवा :
- केरळ सरकारने नुकतीच ‘केरळ सवारी’ ही ऑनलाइन टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
- ही देशातील पहिली राज्य सरकारच्या मालकीची ऑनलाइन टॅक्सी सेवा आहे.
- रिक्षा आणि टॅक्सी चालकांना योग्य मोबदला मिळेल आणि प्रवाशांचंही हित जपलं जाईल, या दोन्ही गोष्टींचा विचार करून केरळ सरकारने ही देशातील पहिली ऑनलाइन टॅक्सी सेवा सुरू केली आहे.
- सरकारने ठरवून दिलेल्या माफक प्रवास भाड्यात जनतेला सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी केरळ सरकारने ‘केरळ सवारी’ ही ऑनलाइन टॅक्सीसेवा सुरू केली आहे.
- सरकारने ठरवून दिलेल्या प्रवास भाड्यात नागरिकांना प्रवास करता येणार आहे.
- ही टॅक्सी सेवा कामगार विभागाच्या अधिपत्याखाली मोटर कामगार कल्याण मंडळाद्वारे (Motor Workers Welfare Board) चालवली जाणार आहे.
- ‘केरळ सवारी’ बाबतचे अॅप लवकरच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिलं जाणार आहे.
दिनविशेष :
- 30 ऑगस्ट 1835 मध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली.
- अमेरिकेतील ह्यूस्टन शहराची स्थापना 30 ऑगस्ट 1835 मध्ये झाली.
- नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदरफोर्ड यांचा 30 ऑगस्ट 1871 मध्ये जन्म झाला.
The post 30 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs appeared first on Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN.
from Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN https://ift.tt/OLBNlkj
via