चालू घडामोडी (8 ऑगस्ट 2022)
इस्रोच्या नव्या प्रक्षेपकाचे-रॉकेटचे यशस्वी उड्डाण :
- कमीत कमी मनुष्यबळाच्या सहाय्याने अवघ्या काही दिवसा सज्ज होत उपग्रह प्रक्षेपण करणाऱ्या इस्रोच्या नव्या रॉकेटचे-प्रक्षेपकाचे-Small Satellite Launch Vehicle (SSLV)चे पहिले उड्डाण इस्रोच्या श्रीहरीकोटा तळावरुन यशस्वी पार पडले.
- नव्या रॉकेटने त्याचे काम चोख बजावले असले, रॉकेटच्या सर्व टप्प्यांनी अपेक्षित कामगिरी जरी केली असली, उपग्रह जरी प्रक्षेपित झाले असले तरी इस्रोने मोहिम पुर्ण झाल्याची घोषणा केलेली नाही.
- इस्रोचा नवा प्रक्षेपक SSLV ची उंची 34 मीटर असून व्यास दोन मीटर एवढा आहे.
- या मोहिमेला इस्रोने SSLV-D1 असं नाव दिलं होते.
- अवघ्या 100 टन वजनाचा SSLV हा नवा प्रक्षेपक फक्त सहा जणांची टीम अवघ्या सात दिवसांत उपग्रह प्रक्षेपणासाठी सज्ज करु शकते.
- 500 किलोग्रॅम वजनापर्यंतचे उपग्रह हे 500 किलोमीटर उंचीपर्यंत प्रक्षेपित करण्याची SSLVची क्षमता आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धात अॅथलेटिक्समध्ये भारताची पदकलूट :
- राष्ट्रकुल स्पर्धेतील अॅथलेटिक्स क्रीडा प्रकार रविवार भारतासाठी पदके मिळवून देणारा ठरला.
- एल्डहोस पॉल आणि अब्दुल्ला अबुबाकेर यांनी तिहेरी उडी प्रकारात इतिहास घडवत अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक कमावले.
- तिहेरी उडीत पॉलने तिसऱ्या प्रयत्नात सरस कामगिरी करताना 17.03 मीटरचे अंतर गाठले.
- त्याच्यापाठोपाठ सहकारी अबुबाकेरने पाचव्या प्रयत्नात 17.02 मीटर उडी मारली.
- बर्मुडाचा जाह नहाल पेरिनशिफ कांस्यपदकाचा मानकरी ठरला.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धात नितू, निकहत, अमितचे सोनेरी यश :
- भारताच्या नितू घंगास (48 किलो), निकहत झरीन (50 किलो), अमित पंघाल (51 किलो) यांनी रविवारी राष्ट्रकुल स्पर्धेतील बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदके पटकावली.
- 2018च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या अमितने अंतिम लढतीत इंग्लंडच्या किरन मॅकडोनाल्डला पराभूत केले.
- पदार्पणवीर नितूनेही अंतिम फेरीत इंग्लंडच्या डेमी रेसटनला 5-0 असे नामोहरम करताना सोनेरी यश संपादन केले.
- तसेच जागतिक विजेत्या निकहतने सुवर्णपदकाच्या लढतीत नॉर्दन आर्यलडच्या कार्ली मॅक नॉलवर 5-0 असा विजय मिळवला.
टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरीत सुवर्ण पदकावर कोरले नाव :
- अचंता शरथ कमल आणि श्रीजा अकुला यांनी रविवारी टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरी प्रकारात भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले.
- अचंता-श्रीजा जोडीने मलेशियाच्या चुंग जावेन आणि लीन कारेन यांचा पराभव केला.
- शरथ कमलचे त्याच्या कारकिर्दीतील मिश्र दुहेरी प्रकारातील हे पहिला सुवर्णपदक ठरले आहे.
- तर, राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या 24 वर्षीय श्रीजाचे देखील हे पहिलेच पदक ठरले आहे.
- पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत सुवर्ण आणि साथियान ज्ञानसेकरन सोबत पुरुष दुहेरीत रौप्यपदक पटकावले आहे.
- त्यामुळे श्रीजासोबत मिळवलेले सुवर्ण पदक हे त्याचे एकून तिसरे पदक ठरले आहे.
भारतीय मुली रौप्य पदकाच्या मानकरी :
- रविवारी महिलांच्या टी 20 क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना खेळवला गेला.
- या सामन्यात भारतीय संघाचा 9 धावांनी पराभव झाला.
- परिणामी ऑस्ट्रेलियाचा संघ सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. तर, भारतीय संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच महिलांच्या टी 20 क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता.
- त्यात सुवर्णपदक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघाने ‘प्रथम विजेता’ होण्याचा मान मिळवला आहे. ए
नितू अन् अमितचा बॉक्सिंमध्ये दोन सुवर्णपदकांची कमाई :
- स्पर्धेच्या दहाव्या दिवशी बॉक्सिंगमध्ये भारताला दोन सुवर्णपदकांची कमाई झाली.
- महिलांच्या 48 किली वजनी गटात नितू घांगसने सुवर्णपदक पटकावले.
- तिच्या पाठोपाठ अमित पंघालनेही अंतिम सामन्यात विजय मिळवून सुवर्ण पदक मिळवले.
- नितूने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 48 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत इंग्लंडच्या डेमी-जेडचा पराभव केला.
- अमितने पुरुषांच्या फ्लायवेट गटातील अंतिम फेरीत इंग्लंडच्या कियारन मॅकडोनाल्डचा पराभव केला.
भारतीय महिला हॉकी संघाला पदक जिंकण्यात यश :
- बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने कांस्यपदक पटकावले आहे.
- भारतीय संघाने पेनल्टी शूट आऊटमध्ये न्यूझीलंडचा 2-1 अशा फरकाने पराभव केला.
- तब्बल 16 वर्षांच्या कालावधीनंतर भारतीय महिला हॉकी संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवले आहे.
- भारताला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध वादग्रस्त पराभवाला सामोरे जावे लागले होते.
- भारताने 2002 मध्ये सुवर्ण आणि 2006 मध्ये रौप्यपदक जिंकले होते.
दिनविशेष :
- 8 ऑगस्ट हा ‘आंतरराष्ट्रीय मांजर दिन‘ आहे.
- सन 1942 मध्ये 8 ऑगस्ट रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांति मैदान) झालेल्या अधिवेशनात चले जाव चा ठराव मंजुर केला. याप्रसंगी महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला.
- भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ध्रुव ही भारताची सहावी व आतापर्यंतची सर्वात मोठी फास्ट ब्रीडर संशोधनपर अणुभट्टी 8 ऑगस्ट 1958 मध्ये कार्यान्वित झाली.
- पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय (Dr. Bhanuben Nanavati College of Architecture for Women) सन 1994 मध्ये 8 ऑगस्ट रोजी सुरू केले.
- सन 1998 मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या.
The post 8 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs appeared first on Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN.
from Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN https://ift.tt/I8u7jyX
via