चालू घडामोडी (26 ऑगस्ट 2022)
यंदा नागपूरमध्ये होणार हिवाळी अधिवेशन :
- विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजकाल शेवटचा दिवस होता.
- 17 ते 25 ऑगस्टदरम्यान झालेल्या या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.
- दरम्यान कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून हिवाळी अधिवेशन मुंबईत होत आहे.
- मात्र, यंदाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये घेण्यात येणार आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र :
- मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
- ”मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. त्याला लवकरात लवकर मंजूरी द्यावी”, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान मोदी यांना केली आहे.
- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार राज्य शासनाने 16 नोव्हेंबर 2013 रोजी केंद्र शासनाला सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे.
- तसेच यासंदर्भात राज्यातील मराठी भाषिक नागरिकांनी सुरू केलेल्या स्वाक्षरी मोहिमेंतर्गत सुमारे 1 लाख 20 हजारांहून अधिक पत्र राष्ट्रपतींना पाठविले आहेत.
औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी :
- औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर करण्याच्या ठरावाला विधानसभेत मंजुरी मिळाली आहे.
- औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव नामांतर करण्याचा ठराव विधानसभेत मांडण्यात आला. यानंतर हा ठराव मंजूर झाला आहे.
- याशिवाय नवी मुंबई विमानतळाला दी. बा. पाटील यांचं नाव देण्यालाही मंजुरी मिळाली आहे.
सुप्रशासनाची अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान :
- सुप्रशासन ही आजच्या युगात आर्थिक आणि राजकीयदृष्टय़ा अत्यावश्यक बाब बनलेली आहे, मात्र काही मोजक्याच प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून त्याची अंमलबजावणी केली जाते.
- बदल घडवणाऱ्या आणि उत्तम प्रशासन पुरवणाऱ्या कार्यक्षक अधिकाऱ्यांचा गौरव ‘इंडियन एक्सप्रेस’कडून केला जाणार आहे.
- माजी सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखालील परीक्षक समितीकडून दुसऱ्या ‘द इंडियन एक्स्प्रेस एक्सलन्स इन गव्हर्नन्स अॅवार्डस’ची लवकरच घोषणा केली जाणार आहे.
- 14 विविध प्रकारांत प्रशासकीय अधिकाऱ्यांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
- ‘इंडियन एक्सप्रेस’ने 2019 पासून ‘द इंडियन एक्स्प्रेस एक्सलन्स इन गव्हर्नन्स अॅवार्डस’ देण्यास सुरुवात केली.
- गेल्या वर्षी करोना महासाथीमुळे या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली नाही.
- पुरस्काराची दुसरी आवृत्तीची घोषणा नुकतीच करण्यात आली असून पुरस्कारासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
अबू धाबी मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धात अर्जुन एरिगैसीला जेतेपद :
- भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगैसीने गुरुवारी स्पेनच्या डेव्हिड अँटोन गुइजारोला हरवून अबू धाबी मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद मिळवले.
- नवव्या फेरीअखेरीस 18 वर्षीय अर्जुनने 7.5 गुणांसह बाजी मारली.
- अर्जुन सर्व नऊ फेऱ्यांमध्ये अपराजित राहिला आणि उझबेकिस्तानच्या जाव्होखिर सिंदारोव्हपेक्षा अध्र्या गुणांची आघाडी मिळवत अजिंक्यपद पटकावले.
- सिंदारोव्हने इराणच्या एम अमिन तबाताबाइैला पराभूत करत दुसऱ्या स्थानावर शिक्कामोर्तब केले.
- ‘लाइव्ह रेटिंग्ज’ यादीत तिसऱ्या स्थानी असलेल्या अर्जुनने गेल्या काही स्पर्धामध्ये आपल्या कामगिरीने सर्वाचे लक्ष वेधले आहे.
- भारतात नुकत्याच पार पडलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये त्याने 34 एलो गुणांची कमाई केली होती.
- अबू धाबीत अर्जुनने सहा विजयांसह तीन गेममध्ये बरोबरी साधली आणि जगातील आघाडीच्या ग्रँडमास्टर्स खेळाडूंच्या उपस्थितीत स्पर्धेत आपला ठसा उमटवला.
दिनविशेष :
- 26 ऑगस्ट 1303 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकले.
- भारतरत्न तसेच नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांचा 26 ऑगस्ट 1910 मध्ये जन्म.
- 26 ऑगस्ट 1999 मध्ये डेव्हिस करंडक लॉन टेनिसपटू नरेन्द्रनाथ यांचे निधन.
The post 26 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs appeared first on Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN.
from Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN https://ift.tt/FUCr4aB
via