चालू घडामोडी (24 ऑगस्ट 2022)
पंढरपुरातील विठ्ठल मंदिरापर्यंत महामार्ग :
- वाखरी ते पंढरपुरातील विठ्ठल मंदिर हा 8.4 किलोमीटर रस्तादेखील आता महामार्गाच्या धर्तीवर बनवला जाणार आहे.
- केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी 150 कोटी रुपयांच्या या कामास मंजुरी दिली आहे.
- या अंतर्गत हा लोकवस्तीतून जाणारा रस्ता चौपदरी, दुपदरी, उड्डाण पूल, भुयारी मार्ग अशा विविध सोयीने हा रस्ता बनवला जाणार असल्याची माहिती दिली.
- तीर्थक्षेत्र पंढरपूर हे राष्ट्रीय महामार्गाला विविध ठिकाणाहून जोडले आहे.
- पंढरीत वर्षांतील विविध वाऱ्यांच्या वेळी लाखो भाविक येत असतात. रोजची भाविकांची संख्याही काही हजारांमध्ये असते.
- अशा वेळी या गर्दीचे व्यवस्थापन करणे, वाहतूक सुरळीत ठेवणे, आपत्कालीन परिस्थिती हाताळणे सोपे जावे या कामी या रस्ते सुधारणांचा उपयोग होणार असल्याचा दावा परिचारक यांनी केला आहे.
नीरज चोप्रा डायमंड लीगमध्ये खेळणार :
- लुसाने येथे होणाऱ्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत शुक्रवारी स्नायूंच्या दुखापतीतून सावरलेल्या नीरज चोप्राच्या कामगिरीकडे क्रीडाक्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.
- या स्पर्धेत चांगली कामगिरी करून नीरजला पुढील महिन्यात झुरिच येथे होणाऱ्या डायमंड लीग अंतिम स्पर्धेत खेळण्याची संधी मिळेल.
- नीरज सध्या चौथ्या स्थानावर आहे.
- डायमंड लीग आयोजकांनी 17 ऑगस्ट रोजीच जाहीर केलेल्या स्पर्धकांच्या यादीत नीरजच्या नावाचा समावेश होता.
- फक्त, त्यावेळी आयोजकांनी त्याच्या नावापुढे तंदुरुस्तीवर नीरजचा सहभाग अवलंबून असल्याचे नमूद केले होते.
- नीरजनेच तंदुरुस्त असल्याचे जाहीर करून स्पर्धेतील सहभाग निश्चित केला.
अमेरिकन स्पर्धेतून सानियाची माघार :
- भारताची प्रमुख टेनिसपटू सानिया मिर्झाने दुखापतीमुळे अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या दुहेरीतून माघार घेतली आहे.
- टोरंटो येथील कॅनेडियन खुल्या स्पर्धेदरम्यान सानियाच्या कोपराला दुखापत झाली होती.
- टोरंटो स्पर्धेत मेडिसन किजच्या साथीने सानियाने उपांत्य फेरी गाठली होती.
- त्यानंतर सानिया गेल्या आठवडय़ात सिनसिनाटी खुल्या स्पर्धेतही खेळली. त्यामुळे सानियाची दुखापत आणखी बळावली.
भारतीय फुटबॉल महासंघावरील प्रशासकीय समिती संपुष्टात :
- अखिल भारतीय फुटबॉल महासंघावरील (एआयएफएफ) प्रशासकीय समितीचा कारभार संपुष्टात आणण्याचा आणि पूर्वनियोजित निवडणूक एक आठवडय़ाने पुढे ढकलण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला.
- ‘फिफा’कडून झालेली निलंबनाची कारवाई आणि पर्यायाने गमावलेले कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने रविवारी ‘एआयएफएफ’वर नियुक्त प्रशासकीय समिती हटविण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता.
- ‘फिफा’शी झालेल्या चर्चेच्या फेऱ्यांनंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला होता.
- ‘फिफा’ने केलेल्या कारवाईनंतर 17 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात सरकारला सक्रिय लक्ष घालण्यास सांगितले होते.
दिनविशेष :
- 24 ऑगस्ट हा ‘आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिन‘ आहे.
- सन 1690 मध्ये 24 ऑगस्ट रोजी कोलकाता शहराची स्थापना झाली.
- सन 1875 मध्ये कॅप्टन मॅथ्यू व्हेब इंग्लिश खाडी पोहणारे पहिला व्यक्ती ठरले.
- स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर यांचा जन्म 24 ऑगस्ट 1888 मध्ये झाला.
- विक्रमवीर भारतीय जलतरणपटू ‘मिहिर सेन‘ यांनी सन 1966 मध्ये जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहून पार केली.
- सन 1995 मध्ये मायक्रोसॉफ्टने विंडोज 95 ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.
The post 24 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs appeared first on Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN.
from Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN https://ift.tt/f17xph8
via