21 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs

मनीषा कल्याण

चालू घडामोडी (21 ऑगस्ट 2022)

छोटय़ा शहरांतील मोठय़ा करचोरीला आता प्राप्तिकर विभागाची नजर :

  • मोठय़ा रकमेचे रोखीने व्यवहार करणाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाने लक्ष केंद्रित केले आहे.
  • मोठी रुग्णालये, मंगल कार्यालये, मॉलमधील मोठी खरेदी, आलिशान वाहन- घरांची खरेदी किंवा रोखीने मोठे उत्पन्न मिळविणाऱ्या व्यावसायिकांवर प्राप्तिकर विभागाची करडी नजर आहे.
  • प्राप्तिकर विभागाने आता आपल्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल केला असून भूतकाळातील करांसाठी तगादा लावण्यापेक्षा अशा मोठयम व्यवहारांवर नजर ठेवून वसुली करण्याची योजना आखली आहे.
  • व्यक्तीकडून विहित मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार झाला असेल आणि करदात्याने प्राप्तिकर विवरणपत्र भरताना म्हणजेच आयटीआर फाइिलगमध्ये त्याचा खुलासा केला नसेल, तर प्राप्तिकर विभागाकडून नोटीस पाठवली जाऊ शकते.

महिला चॅम्पियन्स लीगमध्ये खेळणारी मनीषा पहिली भारतीय फुटबॉलपटू :

  • युवा आघाडीपटू मनीषा कल्याण ‘युएफा’ महिला चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये सहभाग नोंदवणारी पहिली भारतीय फुटबॉलपटू ठरली आहे.
  • ती सायप्रसच्या इंगोमी येथे युरोपियन क्लब स्पर्धेत अपोलोन लेडीज एफसीकडून खेळली.
  • मनीषाने मारिलेना जॉर्जिओयूच्या जागी 60व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरताच हा विक्रम आपल्या नावे केला.
  • ‘युएफा’ महिला चॅम्पियन्स लीगच्या सलामीच्या लढतीत अपोलोन संघाने लॅट्वियातील आघाडीचा क्लब एसएफके रिगाला 3-0 असे पराभूत केले.
  • तिला 2021-22 वर्षांसाठी ‘एआयएफएफ’ सर्वोत्तम महिला फुटबॉलपटूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
  • विदेशी क्लबकडून कराराबद्ध करण्यात आलेली मनीषा ही दुसरी भारतीय खेळाडू आहे.
  • याआधी डांगमेइ ग्रेसला उझबेकिस्तानच्या एफसी नसाफने करारबद्ध केले होते.

झुलनच्या निवृत्तीचा सामना लॉर्ड्सवर :

  • भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी आगामी इंग्लंड दौऱ्यातील 24 सप्टेंबरला होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याची शक्यता आहे.
  • हा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे.
  • झुलनची महिला क्रिकेटमधील सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणना केली जाते.
  • क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून झुलनच्या नावे सर्वाधिक 352 बळी आहेत.
  • परंतु इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. मात्र, ही तिची अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका ठरू शकेल.
  • आता ‘बीसीसीआय’ तिला सन्मानजनक निरोप देण्याच्या विचारात आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

थायलंड पॅरा बॅडमिंटन स्पर्धात प्रमोद-सुकांत जोडीला सुवर्ण :

  • जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असणाऱ्या सुकांत कदमने पॅरालिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या प्रमोद भगतच्या साथीने खेळताना थायलंड पॅरा बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष दुहेरी गटात सुवर्णपदकाची कमाई केली.
  • एकेरीत प्रमोद आणि सुकांत यांनी प्रत्येकी रौप्यपदके पटकावली.
  • सुकांत-प्रमोद जोडीने एसएल3-एसएल4 विभागातील पुरुष दुहेरीच्या अंतिम लढतीत द्वितीय मानांकित ड्वियोको ड्वियोको आणि फ्रेडी सेटिवान जोडीचा 29 मिनिटांत पराभव केला.
  • सुकांतचे हे कारकीर्दीमधील दुहेरीतील दुसरे विजेतेपद ठरले.

माजी फुटबॉलपटू समर बॅनर्जी यांचे निधन :

  • भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार आणि ऑलिम्पिकपटू समर बॅनर्जी यांचे शनिवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
  • फुटबॉल जगतात ‘बद्रु दा’ या नावाने परिचित असलेले बॅनर्जी गेली काही वर्षे अल्झायमर आणि अझोटेमियाने आजारी होते.
  • भारतीय फुटबॉल संघ आतापर्यंत तीन वेळा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.
  • 1956च्या ऑलिम्पिकमध्ये बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली भारताने चौथे स्थान मिळवले होते.
  • त्यांना 2009 मध्ये ‘मोहन बागान रत्न’ पुरस्काराने सन्मानित केले होते.

दिनविशेष:

  • भारत सेवक समाजाचे एक संस्थापक सदस्य ‘गोपाळ कृष्ण देवधर‘ यांचा जन्म 21 ऑगस्ट 1871 मध्ये झाला होता.
  • जगप्रसिद्ध चित्रकार नारायण बेन्द्रे यांचा जन्म 21 ऑगस्ट 1910 मध्ये झाला.
  • सन 1911 मध्ये पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले.
  • जमैकाचा प्रख्यात धावपटू उसेन बोल्ट यांचा जन्म 21 ऑगस्ट 1986 मध्ये झाला.
  • सन 1991 मध्ये लाटव्हिया सोविएत युनियनपासुन स्वतंत्र झाला.
मनीषा कल्याण

The post 21 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs appeared first on Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN.



from Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN https://ift.tt/5Nm7gqw
via

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.