चालू घडामोडी (2 ऑगस्ट 2022)
5G स्पेक्ट्रम लिलावात रिलायन्स जिओचा दबदबा :
- भारतातील दूरसंचार स्पेक्ट्रमच्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वात मोठा लिलाव नुकताच पार पडला.
- तर यात उद्योगपती मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ ही सर्वात मोठी बोली लावणारी कंपनी म्हणून पुढे आली आहे.
- तसेच दुसऱ्या नंबरवर गौतम अदानी समूह आहे.
- या लिलावात एकूण 1.5 लाख कोटी रुपयांच्या बोली लागल्या होत्या. यापैकी 88 लाख 078 कोटी रुपयांच्या बोली मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने लावली होती.
- तर गौतम अदानी यांच्या समूहाने 40 मेगाहर्ट्झसाठी 212 कोटी रुपयांची बोली लावली.
अचिंता शेऊलीचे सुवर्णयश ;
- वेटलिफ्टिंगपटू अचिंता शेऊलीने राष्ट्रकुल स्पर्धेतील पदार्पणातच सुवर्णयश संपादन करण्याची दमदार कामगिरी केली.
- त्याने 73 किलो वजनी गटात भारतासाठी यंदाच्या राष्ट्रकुलमधील तिसरे सुवर्ण, वेटलिफ्टिंगमधील एकूण सहावे पदक मिळवले.
- तसेच त्याने अपेक्षेप्रमाणे खेळ करताना स्नॅचमध्ये 143 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 170 किलो असे एकूण 313 किलो वजन उचलत सुवर्ण कामगिरी केली.
- कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या अचिंताने स्नॅचमधील आपल्या तीन प्रयत्नांत अनुक्रमे 137 किलो, 140 किलो आणि 143 किलो वजन उचलले.
- तसेच क्लीन अँड जर्कमध्ये कोलकाताच्या अचिंताने 166 किलो वजनाने सुरुवात केली.
भारतीय वेटलिफ्टिंगपटूं हरजिंदर कौरला कांस्य पदक :
- बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडूंनी आपला दबदबा निर्माण केला आहे.
- स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारतीय महिला वेटलिफ्टिंगपटू हरजिंदर कौरने 71 किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली आहे.
- कौरने एकूण 212 किलो वजन उचलून इंग्लंडच्या सारा डेव्हिस आणि कॅनडाच्या अॅलेक्सिस अॅशवर्थला मागे टाकत थरारक स्पर्धेत कांस्यपदकावर कब्जा केला.
- स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी वेटलिफ्टिंगमध्ये भारताला एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदकाची कमाई झाली होती.
- मीराबाई चानूने सुवर्ण, महाराष्ट्रच्या संकेत सरगरने रौप्य, गुरुराजा पुजारी कांस्य आणि बिंद्याराणी देवीने रौप्यपदकाची कमाई केली होती.
भारतीय ज्युदोपटूं सुशीला देवीला रौप्य तर विजय कुमार यादवला कांस्य पदक :
- स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारतीय ज्युदोपटूंची कमाल केली आहे.
- महिला ज्युदोपटू सुशीला देवी लिकमाबाम हिने रौप्य तर विजय कुमार यादवने कांस्य पदकाची कमाई केली.
- सुशीला देवी लिकमाबामला 48 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या मायकेला व्हाईटबोईकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
- विजय कुमार यादवने पुरुषांच्या ज्युदोमध्ये सायप्रसच्या पेट्रोस क्रिस्टोडौलाइड्सचा पराभव करत कांस्यपदक जिंकले.
- टोकियो ऑलिंपिकमध्ये ज्युदो क्रीडा प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व करणारी सुशीला ही एकमेव खेळाडू होती.
हरमनप्रीतने मोडला धोनीचा ‘हा’ विक्रम :
- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान महिला टी 20 सामना खेळवण्यात आला.
- तर या शिवाय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरसाठीदेखील हा सामना विशेष ठरला.
- पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकून तिने पुरुष संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला मागे टाकले आहे.
- आंतरराष्ट्रीय टी २० संघाचा कर्णधार म्हणून धोनीने 72 सामने खेळले आहेत. त्यापैकी 41 सामन्यांमध्ये त्याला विजय मिळवता आला.
- तिने टी 20 संघाचा कर्णधार म्हणून 71 सामने खेळले आहेत आणि 42 मध्ये विजय मिळवला आहे.
दिनविशेष :
- सन 1870 मध्ये जगातील पहिल्या भूमिगत ट्यूब रेल्वेची टॉवर सबवेची लंडन मध्ये सुरवात झाली.
- आध्यात्मिक गुरू ‘जे.पी. वासवानी’ यांचा जन्म 2 ऑगस्ट 1918 मध्ये झाला.
- 2 ऑगस्ट 1954 मध्ये दादरा व नगर हवेली हा प्रांत भारतीयांनी पोर्तुगीजांकडुन ताब्यात घेतला.
- सन 2001 मध्ये ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेता पुल्लेला गोपीचंद याची भारतीय क्रीडाक्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी निवड.
The post 2 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs appeared first on Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN.
from Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN https://ift.tt/IXJseVE
via