Maharashtra State GK Daily Quiz in Marathi | | For MPSC Group B and Group C | महाराष्ट्र राज्य GK दैनिक क्विझ मराठी मध्ये |

Daily Quiz in Marathi चा सराव केल्यास आपला वेळ वाचतो, आपल्याकडे मॉक टेस्टमध्ये समर्पित करण्यासाठी एक किंवा दोन तास नसल्यास आपण Daily Quiz in Marathi चा प्रयत्न करू शकता. आपल्या सोयीनुसार आपण या Daily Quiz कधीही घेऊ शकता; आपल्याला फक्त 10-12 मिनिटे वाचण्याची आवश्यकता आहे.

Q1.राज्य पुर्नरचनेसंबंधी फाजल अली आयोगाने केलेल्या प्रमुख शिफारशी
1. विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करावे
2. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र बनविता येणार नाही.
3. गुजरात, मराठवाडा व महाराष्ट्र यांचे द्विभाषिक राज्य
4. मुंबईला स्वतंत्र ठेवण्यात यावे.
(a) फक्त 1, 2, 3
(b) फक्त 1 आणि 3
(c) फक्त 2, 3 आणि 4
(d) फक्त 1 आणि 4

S1. Ans.(b)
Sol. राज्य पुनर्रचना आयोग (29 डिसेंबर 1953) अहवाल सादर: 10 ऑक्टोबर 1955
अध्यक्ष: न्या. एस.फाझल अली.

सदस्य: के.एम. पणीकर आणि एच.एन. कुंझरू
महाराष्ट्राच्या संदर्भात शिफारसी – 1. विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करावे
2. गुजरात, मराठवाडा व महाराष्ट्र यांचे द्विभाषिक राज्य

Q2.नागपूर करार बाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
(a) विधिमंडळाचे किमान एक अधिवेशन नागपूर येथे घ्यावे.
(b) मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर येथे असावे
(c) सरकारी नोकऱ्यात लोकसंख्येच्या प्रमाणात भरती करावी.
(d) मराठवाड्यातील काँग्रेस नेत्यांचा ;नागपूर करारास विरोध होता.

S2. Ans.(d)
Sol. नागपूर करार: सप्टेंबर 1953
महाराष्ट्र राज्य निर्मितीची प्रक्रिया सुरु झाली
या कराराला मुंबई व नागपूरच्या काँग्रेस सदस्यांचा विरोध होता
महत्त्वाच्या तरतुदी: 1. मुंबई, मध्य प्रांत व हैदराबाद राज्यांमधील मराठी भाषिक प्रदेशांचे मिळून एक राज्य असावे. त्याची राजधानी मुंबई असावी.
2. खेडे हा घटक धरला जाईल
3. प्रशासन आणि विकासाच्या दृष्टिकोनातून राज्याचे महाविदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र असे विभाग
4. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असेल आणि विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपूर येथे भरविण्यात येईल. नागपूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ असेल.

Q3. नागपूर करारात मराठवाड्यातर्फे कोणी सही केली?
(a) आर.के.पाटील
(b) शेषराव वानखेडे
(c) देवीसिंग चौहान
(d) नाना कुंटे


S3. Ans.(c)
Sol. नागपूर करारावर एकूण 11 नेत्यांनी सह्या केल्या
आर.के.पाटील आणि शेषराव वानखेडे= विदर्भ तर्फे
नाना कुंटे= उर्वरित महाराष्ट्र

Q4. खालीलपैकी कोणता विभाग काही अटी घालून महाराष्ट्र राज्यात सामील झाला ?
(a) मराठवाडा.
(b) विदर्भ
(c) कोकण
(d) पश्चिम महाराष्ट्र


S4. Ans.(b)
Sol. 1953 च्या नागपूर करारान्वये विदर्भ महाराष्ट्रात सामील झाला.

Q5. प्रत्येक स्थितीत राज्यपालास निरंकुश विवेक बुद्धीचा प्रयोग करण्याची मुभा दिली तर भारतीय संघराज्य ही विखुरली जाईल हे वाक्य खालीलपैकी एकाने राज्यपालाच्या अधिकाराबाबत केले
(a) यशवंतराव चव्हाण
(b) प्रणव मुखर्जी
(c) आर. एस. सरकारिया
(d) डॉ. बी. आर. आंबेडकर


S5. Ans.(a)

Q6. महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळी, 1 मे 1960 ला, 12 मंत्रालय विभाग होते; खालीलपैकी कोणते त्यामध्ये समाविष्ट नव्हते?
1. नियोजन विभाग
2. सहकारी आणि ग्रामीण विकास विभाग.
(a) केवळ 1 योग्य
(b) केवळ 2 योग्य
(c) दोन्ही योग्य
(d) दोन्ही अयोग्य

S6. Ans.(a)
Sol. इतर विभाग: – अन्न आणि नागरी पुरवठा विभाग आणि सिंचन आणि ऊर्जा विभाग असे 12 विभाग होते

Q7. यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते ?
(a) मोरारजी देसाई
(b) बाळासाहेब सावंत
(c) मारोतराव कन्नमवार
(d) शंकरराव चव्हाण


S7. Ans.(c)
Sol. महाराष्ट्रात आतापर्यंत 19 मुख्यमंत्री झाले आहेत ते पुढीप्रमाणे
1. यशवंतराव चव्हाण 2. मारोतराव कन्नमवार 3. बाळासाहेब सावंत 4. वसंतराव नाईक
5. शंकरराव चव्हाण 6. वसंतदादा पाटील 7. शरद पवार 8. ए.आर.अंतुले
9. बाबासाहेब भोसले 10. शिवाजी पाटील निलंगेकर 11. सुधाकरराव नाईक 12. मनोहर जोशी
13. नारायण राणे 14. विलासराव देशमुख 15. सुशीलकुमार शिंदे 16. अशोक चव्हाण
17. पृथ्वीराज चव्हाण 18. देवेन्द्र फडणवीस 19. उद्धव ठाकरे

Q8. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण यांनी कोणती खाती केंद्रीय मंत्री म्हणून सांभाळली आहेत?
(a) वित्त, कृषी, संरक्षण
(b) गृह, ग्रामविकास, नियोजन
(c) परराष्ट्र व्यवहार, गृह, वित्त
(d) संरक्षण, उद्योग, विधि व न्याय


S8. Ans.(c)
Sol. यशवंतराव चव्हाणांची राजकीय कारकीर्द
1. बॉम्बे प्रांताचे मुख्यमंत्री 2. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री 3. भारताचे संरक्षण मंत्री 4. केंद्रीय अर्थमंत्री 5.
परराष्ट्र मंत्री 6. गृह मंत्री 7. उपपंतप्रधान

Q9. महाराष्ट्राच्या पुढील मुख्यमंत्र्यांची त्यांच्या कार्यकाळानुसार(पहिल्यांदा) मांडणी करा ?
(a) मारोतराव कन्नमवार- वसंतराव नाईक – सुधाकरराव नाईक – ए.आर. अंतुले
(b) मारोतराव कन्नमवार- वसंतराव नाईक – ए.आर. अंतुले- सुधाकरराव नाईक
(c) बाबासाहेब भोसले- शिवाजी पाटील निलंगेकर – सुशीलकुमार शिंदे- विलासराव देशमुख
(d) बाबासाहेब भोसले- शिवाजी पाटील निलंगेकर- पृथ्वीराज चव्हाण- अशोक चव्हाण


S9. Ans.(b)
Sol. 1. मारोतराव कन्नमवार – नोव्हेंबर 1962 ते नोव्हेंबर 1963
2. वसंतराव नाईक – डिसेंबर 1963 ते एप्रिल 1975
3. ए.आर. अंतूले – जून 1980 ते जानेवारी 1982
4. सुधाकरराव नाईक – जून 1991 ते फेब्रुवारी 1993
5. बाबासाहेब भोसले – जानेवारी 1982 ते फेब्रुवारी 198
6. शिवाजी पाटील निलंगेकर- जून 1985 ते मार्च 1986
7. सुशीलकुमार शिंदे – जानेवारी 2003 ते ऑक्टोबर 2004
8. विलासराव देशमुख – ऑक्टोबर 1999 ते जानेवारी 2003 आणि ऑक्टोबर 2004 ते डिसेंबर 2008

Q10. महाराष्ट्रात एकूण किती वेळा राष्ट्रपती राजवट लागली आहे?
(a) 1
(b) 2
(c) 3
(d) 4


S10. Ans.(b)
Sol. पहिली राष्ट्रपती राजवट – फेब्रुवारी 1980 ते जून 1980 (इंदिरा गांधी सरकार)
दुसरी राष्ट्रपती राजवट – सप्टेंबर 2014 ते ऑक्टोबर 2014 (नरेन्द्र मोदी सरकार)
तिसरी राष्ट्रपती राजवट – 12 नोव्हेंबर 2019 ते 23 नोव्हेंबर 2019 (नरेन्द्र मोदी सरकार)

The post Maharashtra State GK Daily Quiz in Marathi | | For MPSC Group B and Group C | महाराष्ट्र राज्य GK दैनिक क्विझ मराठी मध्ये | appeared first on Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN.



from Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN https://ift.tt/c6DxYEQ
via

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.