14 मार्च 2022 चालू घडामोडी – Current Affairs

 



 

चालू घडामोडी (14 मार्च 2022)

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक:

  • रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धसंघर्ष अद्यापही सुरुच आहे.
  • रशियाकडून युक्रेनमध्ये बॉम्बहल्ले तसेच हवाईहल्ले केल जात असल्यामुळे जीवित तसेच वित्तहानी होत आहे.
  • तर या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशाची सुरक्षा तसेच सध्याच्या जागतिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रविवारी उच्चस्तरीय बैठक घेतली.
  • तसेच या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी होते.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आजच्या बैठकीला महत्त्वाच्या व्यक्तींची उपस्थिती होती.
  • बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन, परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर परराष्ट्र सचिव हर्षवर्धन तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आदी महत्त्वाच्या व्यक्ती आजच्या बैठकीला उपस्थिते होत्या.

ऋषभ पंत ठरला सर्वात जलद अर्धशतक ठोकणारा भारतीय:

  • श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने अर्धशतक ठोकले आहे.
  • कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम ऋषभ पंतने केला आहे.
  • पंतने भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांचा विक्रम मोडला आहे.
  • तर पंतने अवघ्या 28 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे.
  • बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने अवघ्या 28 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
  • तसेच आपल्या खेळीदरम्यान पंतने 7 चौकार आणि 2 षटकार मारले.
  • त्यामुळे आता भारतातर्फे वेगवान अर्धशतक करणाऱ्यांच्या यादीत भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आले आहे.

‘आयटीएफ’ टेनिस स्पर्धात अंकिता-ऋतुजा जोडी दुहेरीत अजिंक्य:

  • अंकिता रैना आणि ऋतुजा भोसले या भारतीय जोडीने ऑस्ट्रेलियातील बेंडिगो शहरात झालेल्या महिलांच्या ‘आयटीएफ’ टेनिस स्पर्धेतील दुहेरीचे जेतेपद पटकावले.
  • अंतिम सामन्यात अंकिता-ऋतुजा या पुणेकर जोडीने अलेक्झांड्रा बोझोव्हिच (ऑस्ट्रेलिया) आणि वेरॉनिका फाल्कोवस्का (पोलंड) या जोडीला 4-6, 6-3, 10-4 असे नमवले.
  • मागील आठवडय़ात याच ठिकाणी झालेल्या अन्य एका स्पर्धेची अंकित-ऋतुजा जोडीने उपांत्य फेरी गाठली होती.
  • मात्र, त्यानंतर त्यांनी कामगिरीत अधिक सुधारणा करत जेतेपदाला गवसणी घातली.

प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत हॅट्ट्रिकसह रोनाल्डोची विक्रमाला गवसणी :

  • तारांकित आघाडीपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने साकारलेल्या हॅट्ट्रिकच्या बळावर मँचेस्टर युनायटेडने प्रीमियर लीग फुटबॉलच्या सामन्यात टॉटनहॅमवर 3-2 अशी सरशी साधली.
  • तसेच या हॅट्ट्रिकसह रोनाल्डोने अनोख्या विक्रमालाही गवसणी घातली.
  • 37वर्षीय रोनाल्डो आता व्यावसायिक फुटबॉलमधील सर्वकालीन सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला असून त्याच्या खात्यावर तब्बल 807 गोल जमा आहेत.
  • तर त्याने जोसेफ बिकान यांचा विक्रम मोडीत काढला.
  • रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोर्तुगालचे प्रतिनिधित्व करताना विक्रमी 115 गोल मारले आहेत.

दिनविशेष:

  • सन 1931 या वर्षी पहिला भारतीय बोलपट आलम आरा मुंबई मध्ये प्रदर्शित झाला.
  • ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचा जन्म सन 1931 मध्ये झाला होता.
  • सन 1954 मध्ये दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली.
  • सिक्कीममधील आदिवासी समाजातील चोकीला अय्यर यांनी सन 2001 मध्ये भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव म्हणून सूत्रे हाती घेतली होती.
  • सन 2010 मध्ये ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस.एल. भैरप्पा यांच्या हस्ते लोकसंस्कृतीचे उपासक आणि संशोधक डॉ. रा.चिं. ढेरे यांना पुण्यभूषण पुरस्कार पुण्यात देण्यात आला.

 


 

chalu ghadamodi
chalu ghadamodi

The post 14 मार्च 2022 चालू घडामोडी – Current Affairs appeared first on Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN.



from Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN https://ift.tt/GS8N5D9
via

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.