चालू घडामोडी (13 मार्च 2022)
भगवंत मान यांचा VIP कल्चर संपवण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय :
- पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी म्हणजेच आप या पक्षाला बहुमत मिळालं असून त्यांचा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- आपचे विजयी उमेदवार भगवंत मान हे पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत.
- मात्र मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेण्याआधीच भगवंत मान यांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेऊन सत्ता स्थापनाचा देवा केल्यानंतर एक मोठा निर्णय घेतलाय.
- सरकार बनवण्याच्या आधीच पंजाबमधील सर्व 122 माजी मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षा काढून घेण्याचे आदेश भगवंत मान यांनी दिलेत.
- पंजाबमध्ये आपचं सरकार स्थापन होण्याआधी घेण्यात आलेला हा निर्णयमध्ये पंजाबच्या राजकारणामधील व्हीआयपी संस्कृती संपवण्याच्या दृष्टीने मास्टर स्ट्रोक मानला जातोय.
- यासंदर्भातील एक पत्रत विशेष डीजीपी राज्य सशस्त्र पोलीस जेआरसी, कमांडंट जनरल पंजाब होम गार्ड्स तसेच नागरिक सुरक्षा निर्देशक, एडीजीपी/एसपीयू/एसओजी तसेच सीडीओ बाटलियन्सच्या सर्व स्तरावरील आयजीपी आणि डीआयजींसहीत पोलीस अधिक्षकांना आणि विशेष पोलीस अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलीय.
EPFO खातेधारकांचा पीएफ व्याजदरात कपात :
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (सीबीटी) गुवहाटी येथे झालेल्या बैठकीत व्याजदराबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
- तसेच या निर्णयाचा कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
- तर 2021-22 या आर्थिक वर्षासाठी पीएफ खातेधारकांसाठी 8.1 टक्के व्याजदराची शिफारस करण्यात आली आहे, जी चार दशकांतील सर्वात कमी असल्याचे म्हटले जाते.
- बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आलेला हा व्याजदरात कपातीचा निर्णय आता अर्थ मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.
- अर्थमंत्रालयाकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतर निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
आता नागरिकांना स्वतः करता येणार नोंदणी :
- देशातील नागरिक, त्यांची इच्छा असल्यास, आगामी जनगणनेमध्ये ऑनलाइन स्व-गणना करू शकतील.
- कारण सरकारने जनगणनेच्या वेळापत्रकात सुधारणा केल्या आहेत.
- तर यामुळे नागरिकांना ही सुविधा उपलब्ध होणार आहे. मात्र प्रत्यक्ष घरोघरी जाऊन नोंदणीसुद्धा सुरू राहणार आहे.
- ऑनलाइन स्व-गणनेच्या तरतुदीला परवानगी देण्याव्यतिरिक्त, जनगणनेची माहिती गोळा करण्यासाठी घरोघरी जाण्याचं काम पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.
- जनगणनेचा गृहनिर्माण सूचीचा टप्पा आणि NPR अपडेट करण्याची प्रक्रिया 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत देशभरात होणार होता, परंतु करोनाच्या उद्रेकामुळे ती पुढे ढकलली गेली.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धात भारताची वेस्ट इंडिजवर मात :
- महाराष्ट्राची डावखुरी फलंदाज स्मृती मानधना आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर या अनुभवी जोडीने झळकावलेल्या शतकांच्या बळावर भारतीय महिला संघाने शनिवारी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजला 155 धावांनी नेस्तनाबूत केले.
- भारताने दिलेल्या 318 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजचा डाव 40.3 षटकांत 162 धावांत संपुष्टात आला.
- तर या विजयासह भारताने अग्रस्थानी झेप घेतली.
मिताली राजच्या नावावर नवा विक्रम :
- भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने एक अनोखा विक्रम केलाय.
- तर ती महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत कर्णधार म्हणून सर्वात जास्त सामने खेळणारी खेळाडू ठऱली आहे.
- तसेच याआधी मिताली आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेच्या सहा सत्रांमध्ये खेळणारी पहिली खेळाडू ठरली होती.
- तर हा विक्रम अगोदर ऑस्ट्रेलियाची बेलिंडा क्लार्कच्या नावावर होता. तिने आतापर्यंत कर्णधार म्हणून 23 सामने खेळले आहेत.
- तर मितालीचा कर्णधार म्हणून आजचा 24 वा सामना आहे.
- याआधी तिने महिला विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक अशा सहा सत्रांमध्ये खेळणारी पहिली खेळाडू म्हणून मान मिळवला होता.
- तसेच हा विक्रम प्रस्थपित केल्यामुळे ती थेट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पंक्तीत जाऊन बसली होती.
300 पेक्षा अधिक धावा करणारा जगातील सहावा संघ ठरला :
- सलामीवीर स्मृती मानधना आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या शानदार शतकी खेळीने भारताला महिला विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील आपल्या सर्वोच्च धावसंख्येपर्यंत नेले.
- आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2022 च्या महत्त्वपूर्ण सामन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 8 बाद 317 धावा केल्या.
- तर यास्तिका भाटियाने आक्रमक सुरुवात केल्यानंतर स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांनी शतकी खेळी करत चौथ्या विकेटसाठी 184 धावांची भागीदारी केली.
- एकदिवसीय विश्वचषकात भारताची ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
- महिला विश्वचषक स्पर्धेत भारताने प्रथमच 300 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
- महिला विश्वचषकात 300 पेक्षा अधिक धावा करणारा भारत जगातील सहावा संघ ठरला आहे.
- भारतापूर्वी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांनी महिला विश्वचषकात 300 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
दिनविशेष :
- 13 मार्च 1781 मध्ये विल्यम हर्षेल यांनी युरेनसचा शोध लावला.
- सॅन डीयेगो विद्यापीठाची स्थापना 13 मार्च 1897 मध्ये झाली.
- पॅरिसहुन लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना 13 मार्च 1910 मध्ये अटक झाली.
- 13 मार्च 1930 मध्ये क्लाईड डब्ल्यू. टॉमबॉग यांनी प्लुटो ग्रह शोधल्याचे हार्वर्ड विद्यापीठातील वेधशाळेला कळवले.
- अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची 13 मार्च 1940 मध्ये उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.
The post 13 मार्च 2022 चालू घडामोडी – Current Affairs appeared first on Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN.
from Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN https://ift.tt/4qo23wD
via